Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आर्थिक विवंचनेतून शेतकर्‍याने केले असे काही. . . .परिसर शोकसागरात !

 

पाचोरा- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील निपाणे येथे ३५ वर्षीय शेतकर्‍याने आर्थिक विवंचनेतुन विषारी औषध प्राशन करत आपली जीवन यात्रा संपविल्याची दुर्दैवी घटना ५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे.

याबाबत प्राप्त माहिती अशी की, निपाणे ता. पाचोरा येथील शरद भगवान पाटील (वय-३५) या शेतकर्‍यांने निपाणे शेत शिवारात विषारी औषध प्राशन करत आपली जीवन यात्रा संपविल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांच्या मदतीने शरद पाटील यांना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी शरद पाटील यांना मृत घोषित केले.

या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मयत शरद पाटील यांचे पाश्चात आई, वडिल, पत्नी, दोन मुलं, तिनं भाऊ असा परिवार आहे. शरद पाटील यांच्या अकस्मात निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.

Exit mobile version