Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आरोग्य सेवा हीच खरी ईश्वराची सेवा – ना.गुलाबराव पाटील

जळगाव, प्रतिनिधी | आरोग्य सेवा ही ईश्वराची सेवा असून ते पुण्याच काम असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. ते डॉ.कमलाकर पाटील यांच्याद्वारे आयोजित अत्यल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर समारोपाप्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

 

दि.२३ व २४ ऑक्टोबर या दोन दिवशीय अल्प दरात मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबिरात २०० पेक्षा जास्त नागरिकांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या शिबिराचा समारोप पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री,महाराष्ट्र् राज्य तथा पालकमंत्री जळगाव जिल्हा ना.गुलाबरावजी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. याप्रसंगी ते बोलत होते डॉ. कमलाकर पाटील यांनी लक्षात राहणार काम केले असून त्यांचे कार्य हे कौतुकास्पद आहे. डॉ कमलाकर पाटील यांचे पालकमंत्री ना. पाटील यांनी तोंड भरून कौतुक केले. याप्रसंगी व्यापीठावर शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, पंचायत समिती मा. उपसभापती तथा मा. सरपंच डॉ. कमलाकर पाटील, डॉ. विवेक पाटील, डॉ. वृषाली पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. कमलाकर पाटील यांनी केले सूत्रसंचालन संदीप पाटील सर यांनी तर आभार प्रफुल पाटील मानले.

Exit mobile version