Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आरोग्य थीम अंतर्गत नागरिकांना दिले योगाचे धडे !

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील इनरव्हील क्लब ऑफ जळगाव मेन, योग आरोग्य भारती, जळगाव गृहनिर्माण सहकारी संस्था आणि इनरव्हील क्लब ऑफ जळगाव न्यू जनरल यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच आरोग्य थीम अंतर्गत सर्व क्लब सदस्य आणि नागरिकांसाठी योग सत्र आयोजित करण्यात आले होते.

 

नुकतेच डॉक्टर दिवस आणि सीए दिवस पार पडला. यावर्षी सर्व क्लबची संयुक्त संकल्पना आरोग्य असून त्या अंतर्गत योग सत्राच्या माध्यमातून योग आपल्या जीवनात कशी महत्त्वाची भूमिका बजावते, याचे महत्व पटवून देण्यात आले. डॉ. लीना पाटील यांनी ओंकार कसा महत्त्वाचा आहे आणि त्याचा डोक्यापासून पायापर्यंत आपल्या शरीरावर कसा परिणाम होतो हे थोडक्यात समजावून सांगितले. योगगुरु दीपाली देशपांडे यांनी लहान मुलांसाठी योगाबद्दल मार्गदर्शन केले. आणि डॉ. विशाखा गर्ग आणि निशिता रंगलानी यांनी योग व आरोग्य याचे महत्त्व पटवून दिले. उपक्रमाप्रसंगी इनरव्हील क्लब ऑफ जळगाव मेन क्लबच्या अध्यक्षा डॉ.रितू कोगटा, सचिव निकिता अग्रवाल, नूतन कक्कड, उपाध्यक्षा निशिता रंगलानी, इनरव्हील क्लब ऑफ जळगाव न्यू जनरलच्या अध्यक्षा इशिता दोशी, सचिव हेतल सुरतवाला, योगगुरू दीपाली देशपांडे, विशाल जाधव, डॉ.लीना पाटील, डॉ.कृणाल महाजन, डॉ.अमित हिवरकर, डॉ.प्रियंका पाटील, डॉ.नीलम इंगळे, डॉ.विशाखा गर्ग, डॉ.कल्पेश गांधी, डॉ.शरयू विसपुते आदींची उपस्थिती होती. योगानंतर सर्वांना आरोग्यदायी खजूर, शेंगदाणे, केळी, गुळ पावडर, ताक देण्यात आले.

Exit mobile version