Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आरटीओ कार्यालयातील करवसुली अधिकाऱ्यास शिवीगाळ; एकावर गुन्हा

FIR

जळगाव प्रतिनिधी । शहरातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील करवसुली अधिकारी यांनी शिवगाळ, दमदाटी आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एकावर रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कर वसुली अधिकारी चंद्रशेखर शंकरराव इंगळे (वय-५१) रा. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील नवीन वाहन नोंदणी विभागात कर वसुली अधिकारी म्हणून कामाला आहे. त्यांच्या कार्यालयातरील वरिष्ठ लिपीक दिलीप रामभाऊ पाटील यांचे गाडी (एमएच १९ सीयू २७२७) यांच्यावरील चालक अक्षय बोदडे रा. समता नगर, रामानंद नगर २८ मे रोजी चंद्रशेखर यांच्याकडे येऊन म्हणला की, ‘तु मातला आहे, तु येथे कसे काम करतो, ते मी पाहतो, मला खर्चाला १ हजार रूपये दे, नाहीतर तू कार्यालयाच्या बाहेर आलयावर मी तुला पाहूने घेईन’. त्यावेर चंद्रशेखर म्हणाले की, ‘तुझे येथे काय काम आहे ?’ याचा राग येवून चालक बोदडे यांने कार्यालयातील टेबलावर ठेवलेले रजिस्ट्रर खाली फेकून दिले. हा प्रकार उपप्रादेशीक परिवहन अधिकारी श्याम लोही यांच्या समक्ष घडला. लोही यांच्या समोरच बोदडे हा अंगावर धावून आला. त्यानंतर लोही यांनी शिपाईच्या माध्यमातून बोदडे याला कार्यालयाच्या बाहेर काढले. याप्रकरणी चंद्रशेखर पाटील यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणि कोवीड-१९च्या नियमांचे उल्लंघन, शिवीगाळ आणि दमदाटी प्रकरणी भादवी कलम ३५३, ३२३, ५०४, ५०६, १८८, २६९ प्रमाणे संशयित आरोपी अक्षय बोदडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल मनोज इंद्रेकर करीत आहे.

Exit mobile version