आरटीओ एजंटची दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील हॉटेल पारस नजीकच्या पन्नालाख वखार येथून आरटीओ एजंटची ३० हजार रूपये किंमतीच दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत रविवारी ८ जानेवारी रोजी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, किरण युवराज कोळी (वय-३९) रा. एकनाथ नगर, रामेश्वर कॉलनी जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. आरटीओ एजंटचे काम करून आपला उदरनिर्वाह करत असतो. (एमएच १० डीजी ३८६९) क्रमांकाची दुचाकी ही त्याच्या मालकीची आहे. १ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता किरण कोळी हा तरूण कामाच्या निमित्ताने दुचाकीने जळगाव शहरातील हॉटेल पारस नजीकच्या पन्नालाख वखार येथे आला होता. वखारीजवळ त्याने त्यांची दुचाकी पार्किंगला लावलेली होता. एक तासानंतर काम आटोपून आल्यानंतर दुचाकीजवळ आला असता त्याला जागेवर दुचाकी दिसून आली नाही. त्याने दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही मिळाली नाही. अखेर आठ दिवसानंतर रविवारी ८ जानेवारी रोजी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विकास सातदिवे करीत आहे.

 

Protected Content