Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आरटीई नुसार झालेल्या प्रवेशप्रक्रियेच्या चौकशीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

भुसावळ, प्रतिनिधी । वावडदा ता.जळगाव येथील एल.एच.पाटील इंग्लिश मेडीयम स्कुल हि शाळा वावडदा गावापासून ५०० ते ७०० मीटर अंतरावर आहे तरी देखील या गावतील बरेच विद्यार्थी स्थानिक रहिवासी असून सुद्धा २०२०-२१ या वर्षातील आरटीई २५ टक्के अंतर्गत प्रवेशासाठी वंचित राहिले आहेत तसेच काही विद्यार्थी अजूनही प्रतीक्षा यादीत आहेत.याबाबतची तक्रार वावडदा येथील पालकांनी केली आहे.

शाळेजवळील स्थानिक रहिवासी आर्थिक दुर्बल घटकातील पालकांच्या पाल्यास प्राथमिक शिक्षण मोफत मिळावे,शिक्षणाचा अधिकार मिळावा यासाठी शाळांमध्ये काही प्रवेश राखीव ठेवण्याची आरटीई कायद्यात तरतूद आहे. मात्र वावडदा येथील रहिवासी नसतांना सुद्धा काही पालकांनी वावडदा गावात रहिवास असल्याचे खोटे पुरावे दाखवत एल. एच. पाटील इंग्लिश मेडीयम शाळेत आपल्या पाल्यांचे प्रवेश मिळवले व त्यामुळे गावातील स्थानिक रहिवासी असलेले विद्यार्थी यामुळे प्रवेशापासून वंचीत राहिले आहेत. वावडदा येथील पालकांनी याबाबत राज्य शिक्षण संचालक पुणे यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली होती. शिक्षक संचालकांनी देखील तक्रारीची दखल घेत जळगाव शिक्षणाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले होते. मात्र त्या प्रकरणाची अद्यापही चौकशी झाली नसून दोषी पालकांच्या पाल्यांचे प्रवेश रद्द झालेले नाही येत त्यामुळे या प्रकरणाची त्वरित चौकशी करण्यात येऊन गावातील स्थानिक विद्यार्थ्यांना न्याय द्यावा हि विनंति जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देवून राज्याचे मुख्यमंत्री व शिक्षण मंञी यांच्याकडे वावडदा येथील अन्यायग्रस्त पालक प्रमोद जानकीराम पाटील,संदीप चितामन पवार यांनी केली आहे.

Exit mobile version