Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आयपीएस अधिकाऱ्याला ड्रायव्हरमुळे कोरोनाचा संसर्ग

मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईतील एका आयपीएस अधिकाऱ्याला आपल्या ड्रायव्हरमुळे कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, राज्यभरात आतापर्यंत जवळपास साडेतीनशे पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.

 

कोरोना बाधित अधिकारी दक्षिण मुंबईत नियुक्त आहे. या अधिकाऱ्याचा ड्रायव्हर काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आला होता. मात्र, या अधिकाऱ्यास कोणतीही कोरोनाची लक्षणे नव्हती. पण त्यांनी कोरोनाची चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली. यानंतर आता या अधिकाऱ्यास होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. सध्या ३५ पोलीस अधिकारी आणि ३५० पोलीस कर्मचारी यांच्यावर उपचार सुरु असून दुर्दैवाने राज्यातील ४ पोलिसांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

Exit mobile version