Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘आयपीएल’मध्ये १० संघ सहभागी होणार

अहमदाबाद, वृत्तसंस्था । आयपीएल २०२२ मध्ये १० संघ सहभागी होणार आहे. सध्या आयपीएलमध्ये ८ संघ आहेत. यात आता आणखी दोन संघाची भर पडणार आहे. १० संघ सहभागी होण्यास बीसीसीआयने मंजुरी दिली आहे. बीसीसीआयच्या सर्वसाधारण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

आता 2022 पासून आयपीएलमध्ये 10 संघ खेळणार आहेत. अहमदाबाद येथे आज झालेल्या बीसीसीआयच्या एजीएम बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत 8 संघ खेळत आहेत. दहा संघांचे आयपीएलमध्ये 94 सामने असतील ज्यासाठी सुमारे अडीच महिने लागणार आहेत. याचा परिणाम आंतरराष्ट्रीय क्रिकेट वेळापत्रकारवर होण्याची शक्यता आहे.

Exit mobile version