Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आयटीआयसमोर मालवाहू रिक्षाला कारची धडक; रिक्षाचालक जखमी

जळगाव प्रतिनिधी । शहरातील आयटीआय समोरील महामार्गावर कार आणि मालवाहतूक रिक्षाची समोरासमोर धडक होवून भीषण अपघात झाल्याची घटना गुरूवारी रात्री ११ वाजता घडली. यात मालवाहू रिक्षाचालक जखमी झाले. याप्रकरणी कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपघात एवढा मोठा होता की मालवाहू रिक्षाचे दोन तुकडे झाले आहेत. आपघातात हे जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहे.

अधिक माहिती अशी की, मालवाहू रिक्षाचालक कमरोद्दीन शेख बाबू (४५, रा. जोशीवाडा, मेहरूण) हे कुटूंबीयांसह वास्तव्याला आहेत. दीड ते दोन महिन्यापूर्वीच त्यांनी मालवाहतूक रिक्षा घेतली असून ती चालवून ते कुटूंबीयांचा उदरनिर्वाह करतात. गुरूवारी रात्री गोरगरिबांना जेवण वाटप केल्यानंतर ते रिक्षा घेवून शिव कॉलनीकडून मेहरूणच्या दिशेने निघाले होते. रात्री ११ वाजेच्या सुमारास आयटीआयसमोरून जात असताना समोरून भरधाव येणाऱ्या कारने (एमएच. ३९.जे. ००२७) त्यांच्या रिक्षाला जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की, चक्क रिक्षाचे दोन तुकडे झाले. अर्थात रिक्षाची ट्रॉली तुटून रिक्षा दुभाजकात अडकली.

कारचालक हा मद्यांच्या नशेत होता. कारमधून उतरल्यानंतर चुक नसताना मला त्याने मारहाण केली. काही वेळानंतर तू माझ्या कारमधून फाईल व पैसे चोरले असा म्हणायला लागला. काही वेळाने दुचाकीवर आलेल्या तरूणांसोबत तो चालक फरार झाला, अशी माहिती जमखी मालवाहतूक रिक्षाचालक याने सांगितले. जखमी कमरोद्दीन यांच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान, ती कार एका अधिका-यांची असल्याची चर्चा सुरू होती.

अपघात मालवाहतूक रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर कारचे सुध्दा पुढील भागाचे नुकसान झालेले आहे. या अपघातात रिक्षाचालक कमरोद्दीन शेख यांच्या हाता, पायाला तसेच डोक्याला गंभीर दुखातप झाली आहे. अपघातीची माहिती मिळताच रामानंदनगर पोलिसांनी सुध्‍दा रात्री घटनास्थळी धाव घेतली होती. नंतर शेख यांनी कार चालकाविरूध्‍द रामानंदनगर पोलीस ठाण्‍यात तक्रार दिली.

Exit mobile version