Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आयएमएतर्फे ‘ जागतिक आरोग्य दिनानिमित्त पर्यावरण व आरोग्य’ प्रभात फेरी

जळगाव,लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जागतिक आरोग्य दिनानिमित्त इंडियन मेडीकल असोसिएशनच्या वतीने ‘पर्यावरण व आरोग्य ‘ या विषयी प्रभातफेरी काढण्यात आली.

गुरुवार दि. ७ एप्रिल रोजी सकाळी ६.३० वाजता आयएमए हॉल येथून आयएमए अध्यक्ष डॉ. दीपक आठवले, सचिव डॉ. जितेंद्र कोल्हे व समन्वयक डॉ. पंकज शाह व डॉ. सारिका पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ‘पर्यावरण व आरोग्य ‘ या विषयी प्रभातफेरी काढण्यात आली. प्रभातफेरी चा समारोप गांधी उद्यान जळगाव येथे करण्यात आला. यांत आयएमएचे जवळपास ६० सभासद सहभागी झाले होते. समारोपारात बालरोग तज्ञ डॉ. हेमंत पाटील यांनी ‘पर्यावरण व आरोग्य ‘ या विषयावर मार्गदर्शन केले. डॉ. हेमंत पाटील हे स्वतः पर्यावरण प्रेमी असून यांचा या विषयावर गाढा अभ्यास आहे. त्यांनी विविध पैलूंवर प्रकाश टाकून उपस्थित नागरिकांना तसेच जे सकाळच्या वेळेत उद्यानात येतात त्या नागरिकांना व सभासदांना अवगत केले. या कार्यक्रमासाठी जिल्हा पोलीस दल , जैन इरिगेशन सिस्टिम अध्यक्ष अशोक भाऊ जैन यांचे सहकार्य लाभले .

Exit mobile version