Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आम्ही हिंदुत्वाच्या रक्षणासाठी शिवसेनेतच – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आजवर नारायण राणे, छगन भुजबळ आदींसारख्या अनेकांनी शिवसेनेला सोडले. मात्र आम्ही व शिंदे साहेबांनी शिवसेनेला सोडलेले नाही. आम्ही हिंदुत्वाच्या रक्षणासाठी शिवसेनेतच आहोत असं म्हणत पालकमंत्री गुलाबराव पाटील हे पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आक्रमक होतांना दिसले.  ते तालुक्यातील बांभोरी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण प्रसंगी जाहीर सभेत बोलत होते.

 

जल जीवन मिशन अंतर्गत २ कोटी ३८ लक्ष पाणीपुरवठा योजना, बांभोरी बु.- अनोरे रस्त्याचे डांबरीकरण ५९ लक्ष, आमदार निधीतून  जवखेडा रस्ता डांबरीकरण २० लक्ष, गावंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण १० लक्ष अश्या एकूण ३ कोटी २९ लक्षच्या चौका – चौकात विविध विकास कामांचे भूमिपूजन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गावातून मंत्री गुलाबराव पाटील व मान्यवरांची ढोल – ताशे व फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणूक काढण्यात आली.

 

अंजनी मध्यम प्रकल्पास सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळालेली असून  एरंडोल तालुक्यात 2018 हेक्टर क्षेत्र तर धरणगाव तालुक्यात 763 हेक्टर असे एकूण 2831 हेक्टर क्षेत्र सिंचनाचा फायदा होणार आहे.  धरणगाव तालुक्यातील 763 हेक्टर क्षेत्रापैकी एकट्या बांभोरी गावात 440 हेक्टर क्षेत्र म्हणजे सुमारे 1000 एकर क्षेत्र ओलिताखालील येणार आहे. यासाठी धरणगाव तालुक्यातील कामासाठी 30 कोटी रुपयांची सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळाली असून तांत्रिक मान्यता घेऊन निवेद्य प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. ना. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नाने सदर बंदिस्त पाईपलाईनच्या कामास मंजुरी मिळाल्याने शेतकरी ही जोपासले जाणार असल्यामुळे गावातील शेतकरी व ग्रामस्थांनी ग्रामपंचायत विकासासाठी यांनी एकत्रित या पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सत्कार करून आभार मानले आहे.

 

यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख गजानन पाटील यांनी सांगितले की, सर्वसामान्यांना मोठा करणारा नेता म्हणजे गुलाबभाऊ असून विकास कामे करणाऱ्यांच्या पाठीशी कायमस्वरूपी साथ देऊन  खंबीरपणे उभे रहा असे आवाहन केले तर भाजपाचे सुभाष अण्णा पाटील यांनी विकास कामांसाठी सर्वांनी एकत्र येऊन आम्ही शिवसेनेसोबत एकजुटीने काम करणार असल्याचे सांगितले. यावेळी उपजिल्हाप्रमुख पी.एम. पाटील, जिल्हाप्रमुख निलेश पाटील यांनी  मंत्री गुलाबराव पाटील हे एक लाखाच्या मताधिक्याने निवडून येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

 

याप्रसंगी व्यासपीठावर उपजिल्हाप्रमुख पी. एम. पाटील, तालुकाप्रमुख गजानन पाटील, भाजपाचे ज्येष्ठ नेते सुभाषअण्णा पाटील, तालुका संघटक रविंद्र चव्हाण, मार्केटचे  सदस्य प्रेमराज पाटील, प्रमोद पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, युवा सेनेचे  भैया महाजन, आबा माळी,  दीपक भदाणे, शेतकरी सेनेचे विनायक महाजन,  किशोर पाटील, सरपंच कमलबाई भिल, उपसरपंच गोपीचंद सोनवणे, माजी सरपंच सुभाष पाटील, शिवदास पाटील, नरेश पाटील, अंकुश पाटील, विक्रम पाटील, अमृत पाटील, वि.का.सोसाचे चेअरमन दिलीप पाटील, अर्जुन सोनवणे, अंजनी मध्यम प्रकल्पाचे उपविभागीय अधिकारी आर. जे. पाटील,  शाखा अभियंता व्ही. जी. परब, पी. बी. बोदडे, सर्व  ग्रा.पं. सदस्य, सोसायटीचे संचालक, डी.ओ. पाटील , निंबा कंखरे,  प्रिया इंगळे, पूनम पाटील,  कृणाल इंगळे,  रेखाताई पाटील,  सत्यवान कंखरे, नगरसेवक पप्पू भावे, विजय महाजन, वासुदेव चौधरी, शुभम चव्हाण, दिपक जाधव यांच्यासह परीसरातील सरपंच व पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात शाखा अभियंता विजय परब यांनी सांगितले की, बांभोरी गावांत   440 हेक्टर म्हणजे 1 हजार  एकर शेती ओलीताखाली आणण्यासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी 31 कोटींचे बंदिस्त लाईनच्या योजनेस मंजुरी मिळून दिली  असून लवकरच कामाला प्रारंभ होणार असल्याचे  सांगितले तर सूत्रसंचालन युवासेनेचे भैय्या मराठे सर यांनी केले. आभार मार्केटचे संचालक प्रेमराजबापू पाटील यांनी मांनले. कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन प्रेमराज पाटील, सुभाष पाटील, ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी  केले होते.

Exit mobile version