Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आम्ही ब्रुक फार्माच्या मालकाची वकिली करु, तुम्ही सचिन वाझेची करता त्याचं काय? — प्रविण दरेकर

 

 

मुंबई:  वृत्तसंस्था ।  आम्हाला ब्रुक फार्माच्या मालकाची वकिली करावी लागली तरी आम्ही करू मात्र तुम्ही वाझेची वकिली करता त्याचे काय ?, असा सवाल प्रविण दरेकर यांनी राज्य सरकारला केला

 

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राज्य सरकर जनतेच्या जिवाचं रक्षण करू शकत नाही, असा आरोप केला. जनतेसाठी 100 गुन्हे दाखल केले तरी मी आणि देवेंद्र फडणवीस त्यासाठी तयार आहोत, असं वक्तव्य दरेकर यांनी केलं आहे. पोलिसांकडे माहिती होती त्यामुळे ब्रुक कंपनीच्या संचालकाची चौकशी, यापुढे सरकारी कामात हस्तक्षेप सहन केला जाणार नाही,गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी इशारा दिला होता. त्यावर दरेकरांनी प्रतिक्रिया दिली आहे..

 

राज्य सरकारला रेमेडेसिव्हीर साठी आवश्यक परवानगीची कल्पना नव्हती. मी स्वतः राजेंद्र शिंगणे यांना भेटून आम्ही हे विकणार नसल्याचे देखील स्पष्ट केलं होतं. ब्रुक फार्माच्या मालकाला पोलिसांनी आरोपीसारखे ताब्यात घेतले. आम्ही पोलीस आयुक्त ,जॉईंट सिपी आणि उपयुक्तांना देखील फोन केला होता. मात्र, त्यांचं वक्तव्य सरकारच्या दबावाखाली असल्यासारखं वाटत होता, असा आरोप प्रविण दरेकर यांनी केला.

 

आम्ही हस्तक्षेप 100 टक्के केला त्यामुळे आम्ही केंद्रातील मंत्र्यांसोबत देखील बोलत होतो . रेमेडेसिव्हीर मिळणं हा आमचा उद्देश होता. 100 चौकशा केल्या तरी चालतील. तुम्हाला 60 हजाराचा साठा असल्याची माहिती मिळाली होती तर ती जाहीर करा, असं आव्हान दरेकरांनी दिलं आहे. आम्ही रेमेडेसिव्हीरचा धंदा भाजप कार्यालयातून मांडणार नव्हतो, असंही दरेकर म्हणाले.

 

 

रेमेडेसिव्हीर आणायला आम्ही मदत करत असताना आभार करण्याचे सोडून आडकाठी केली जाते आहे. राज्यातील मरणाच्या उंबरठ्यावर असलेल्या नागरिकांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न सरकार करतंय, असं प्रविण दरेकर म्हणाले.

Exit mobile version