आम्ही गेलो तरी इतिहास राहणार आणि राहिलो तरी ! : सत्तार

नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आपल्या वक्तव्यांमुळे नेहमी वादात सापडणारे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज आगामी घडामोडींबाबत भाष्य केले आहे.

कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलतांना पुन्हा एकदा आक्षेपार्ह विधान केले आहे. आपले मतदारसंघात चांगली कामे करत असल्याने दांडगा जनसंपर्क आहे. यामुळे मी कुत्रा निशाणीवर लढलो तरी निवडून येईल असे ते म्हणाले. विशेष म्हणजे त्यांनी आधी देखील हेच वक्तव्य केले होते.

दरम्यान, सत्तार यांनी आज राज्यातील आगामी काही दिवसांमध्ये घडणार्‍या संभाव्य घडामोडींवर देखील भाष्य केले. ते म्हणाले की, एकनाथ शिंदे हे आमचे कॅप्टन आहेत. आमचा कॅप्टनच अपात्र ठरला तर बाकी काही बघण्याचा प्रश्‍नच येणार नाही. अपात्रतेची टांगती तलवार असणार्‍या १६ आमदारांमध्ये आपण देखील आहोत. यामुळे प्लॅन-ए, प्लॅन-बी तयार असतो. तसे घडले तर ठिक, अन्यथा आम्ही गेलो तरी इतिहास घडेल आणि राहिलो तरी ! असे ते म्हणाले.

Protected Content