Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आम्ही कोणत्याही प्रकारच्या चौकशीला घाबरत नाही : देवेंद्र फडणवीस

fadanvis thakare

 

मुंबई (वृत्तसंस्था) ‘जलयुक्त शिवार असो की वृक्षारोपण. आम्ही कोणत्याही प्रकारच्या चौकशीला घाबरत नाही. उलट १९९९ ते २०१९ दरम्यानच्या राज्याच्या आर्थिक स्थितीवर श्वेतपत्रिका काढायला हवी. जेणेकरून खरे चित्र जनतेपुढे येईल,’ अशी भूमिका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज मांडली.

 

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष भाजपनं आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी फडणवीस बोलत होते. महाविकास आघाडी सरकारनं फडणवीस सरकारच्या अनेक योजनांची चौकशी करण्याच संकेत दिले आहेत. त्यावर 1999 पासून ते 2019पर्यंतच्या आर्थिक स्थितीवर श्वेतपत्रिका नक्की काढली पाहिजे. तसे झाल्यास खरे चित्र जनतेपुढे येईल, असे आवाहनही त्यांनी ठाकरे सरकारला केला आहे. महाविकास आघाडी सरकारने आमच्या सरकारच्या अनेक योजनांची चौकशी करण्याचे सूतोवाच केले आहेत. जलयुक्त शिवार व वृक्षारोपण योजनांवर राष्ट्रवादीने टीका केली होती.

Exit mobile version