Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आमोदे येथे बाहेर गावाहुन आलेल्यांचा सर्व्हे ; हातावर होम क्काँरटाईनचे शिक्के

 

फैजपूर, प्रतिनिधी । आमोदा येथे स्थापन करण्यात आलेल्या ग्रामस्तरीय समीतीने गावात बाहेर गावाहुन आलेल्या नागरीकांचा सर्व्हे करुन जनजागृती केली जात आहे. अशा नागरिकांच्या हातावर क्काँरटाईन होम चे शिक्के मारणे सुरु असल्याचे आरोग्य विभागाकडुन सांगण्यात आले.

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत बऱ्हाटे यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोणा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. फिरोज तडवी याच्याकडुन कोरोना व्हायरस या संसर्गजन्य आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य विभाग सतर्क असून बाहेरून आलेल्या नागरीकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. आमोदे येथे स्थापन करण्यात आलेल्या ग्रामस्तरीय समीतीमधील पदाधिकारी दररोज बाहेर गावाहुन आलेल्या नागरीकांना हिंगोणा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नेऊन तपासणी करण्यात येत आहे. सरपंच राहुल तायडे, ग्रामविकास अधिकारी शरद नारखेडे, तलाठी मधुकर खुर्दा, मंडल अधिकारी बंगाळे साहेब, पोलिसपाटील तुषार चौधरी, आशा स्वंयमसेविका मनिषा वैष्णव व इतर सहकारी, आरोग्य सेविका व्ही. व्ही. तळेले, ग्रा.पं. कर्मचारी निलेश पाटील, कोतवाल लिलाधार सपकाळे, संगणक परिचालक संजय कपले यांनी गावात घरोघरी जाऊन ‘क्काँरटाईन होम’ हा शिक्का बाहेरून आलेल्या नागरीकांचा डाव्या हातावर मारुन घराबाहेर जाऊ नये असा सल्ला देत आहे. आमोदे येथे बाहेर गावाहून आलेल्या ९६ नागरीकांची नोंद करण्यात आली असल्याचे संबंधितांनी सांगितले.

Exit mobile version