Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आमोदा ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकारी गौतम वाडे यांची नियुक्ती

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील आमोदे या गावातील ग्राम पंचायतच्या ग्रामविकास अधिकारी म्हणुर गौतम आधार वाडे यांनी पदभार स्विकारले आहे.  आता मागील एक वर्षापासुन नागरीकांच्या प्रलंबीत कामांना गती मिळेल.

 

यावल तालुक्यातील एक महत्वाचे गाव म्हणुन ओळखले जाते, या गावातील ग्रामपंचायतीस नियमीत ग्रामविकास अधिकारी नसल्याने मागिल एक वर्षापासून ग्रामविकास अधिकारी डी.डी. पाटील यांच्याकडे ग्रामपंचायतीचे अतिरिक्त प्रभारी कारभार सोपविण्यात आले होते. आता आमोदे ग्रामपंचायतीला प्रभारीराज संपले असुन या ठीकाणी ग्रामविकास अधिकारी यांच्या रिक्त जागेवर वराडसिम तालुका भुसावळ येथुन विनंती बदली वरून यावल पंचायत समितीत आले असुन , त्यांना तालुक्यातील आमोदे ग्रामपंचायतीचा पदभार सोपविण्यात आला आहे.

 

ग्रामविकास अधिकारी गौतम वाडे यांनी यापुर्वी यावल तालुक्यातील न्हावी, हिंगोणा ,मारूळ , शिरसाड , साकळी याशिवाय वाघोदा तालुका रावेर आणी भुसावळ तालुक्यातील साकेगाव व वराडसिम या सर्व ठीकाणी त्यांनी मागील २५ वर्षात पारदर्शी व गावाच्या सर्वांगीण विकासासह स्वच्छता, पाणीपुरवठा , आणी नागरींच्या मुलभुत सुविधा व समस्यांना अधिक प्राधान्य देणारे एक उत्कृष्ठ प्रशासकीय अधिकारी म्हणुन गौतम वाडे असुन त्यांच्या २५ वर्षाच्या अनुभवी सेवा कालखंडाचा आमोदे गावास फायदा होईल अशी अपेक्षा आमोदे सरपंच व ग्रामस्थांच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे .

Exit mobile version