आमिष दाखवत महिलेची सोन्याची पोत लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील गणेश कॉलनीतील गुंजन खरेदी विक्री केंद्राजवळ अज्ञात दोन भामट्यांनी वृद्ध महिलेला डबल करण्याचे आमिष दाखवत सोन्याची पोत लांब‍िल्याची घटना सोमवार ८ मे रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, वत्सला सुभाष चौधरी (वय-६८, रा. गुरुदत्त कॉलनी, स्वामी समर्थ केंद्राजवळ, गणेश कॉलनी) या आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. सोमवार ८ मे रोजी दुपारी १२ वाजता हॉस्पिटलमध्ये औषधी घेण्यासाठी रिक्षाने गेल्या. गणेश कॉलनीतील गुंजन खरेदी विक्री केंद्रच्या जवळ त्या रिक्षातून उतरल्या. त्यावेळी दोन अनोळखी व्यक्ती त्यांच्याकडे आले त्यांनी सांगितले की, “तुमचा डबलचा फायदा करून देतो, तुमच्या गळ्यातील पोत मला काढून द्या” असे सांगितल्यावर वृद्ध महिलेने गळ्यातील सोन्याची पोत काढून दिली. दोघांपैकी एकाने पोत हातात घेऊन कागदात गुंडाळून दोरा बांधून वृद्ध महिलेच्या पिशवीत ठेवली व सांगितले की, “तुम्ही आता घरी जा, घरी गेल्यावर ही पुडी उघडा” असे सांगितले त्यानुसार वृद्ध महिला घरी गेल्या. पुडी उघडून बघितले तर सोन्याची पोत नव्हती. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मुलगा अशोक सुभाष चौधरी यांना सोबत घेवून वृध्द महिला जिल्हापेठ पोलीस ठाणे गाठले. वृद्ध महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून दुपारी ५ वाजता अज्ञात दोन जणांवर जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Protected Content