Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आमदार रोहित पवारांची भाजप नेत्यांवर टीका

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । सरकार पडण्यासाठी आपण जेवढे शर्थीचे प्रयत्न करत आहात, तेवढे राज्याच्या हितासाठी करावेत. संकटकाळी जनतेसोबत, सरकारसोबत उभं रहावं. महाराष्ट्र आपला सदैव ऋणी राहील!” असे रोहित पवार यांनी ट्विटरद्वारे भाजपला  उद्देशून   म्हटले आहे

 

गुजरातपेक्षा महाराष्ट्राची लोकसंख्या दुप्पट आहे. इथे कोरोना रुग्णांची संख्याही जास्त आहे. तरी महाराष्ट्रापेक्षा गुजरातलाअधिक लस पुरवठा का? लस पुरवठ्याबाबत महाराष्ट्राशी केंद्राचा दुजाभाव का केला जातोय, असा प्रश्न सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी उपस्थित केला. लसीच्या तुटवड्यावरुन राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार असं चित्र निर्माण झालेलं असताना त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रापेक्षा जवळपास दुप्पट लोकसंख्या असणाऱ्या उत्तर प्रदेशपेक्षाही जास्त लसींचा पुऱवठा राज्याला करण्यात आला आहे, असा पलटवार केला होता. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी टीका केली आहे.

 

“केंद्र सरकारने महाराष्ट्राला किती आणि कशी मदत केली, हे सांगायची आता वेळ नाही. योग्य वेळी ते जनतेला नक्की कळेल. सध्या राज्याला संकटातून बाहेर काढायची वेळ आहे. त्यासाठी विरोधी पक्षाचे नेते नक्कीच हातभार लावतील, ही अपेक्षा. विरोधी पक्षाला विनंती आहे की, किमान संकट काळात तरी राजकारण करू नका. .असेही ते म्हणाले

 

“लस वितरण लोकसंख्येच्या आधारावर होत नसूनही विरोधक महाराष्ट्राची तुलना उत्तर प्रदेशशी करतायेत. राज्यातील रुग्णसंख्या बघता लस पुरवठा किती व्हावा, याचा विरोधकांनी विचार करावा”, अशा शब्दात त्यांनी फडणवीसांवर नाव न घेता निशाणा साधला. त्यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचं उदाहरण दिलं. लसीचा साठा संपल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेने ९ तारखेला लसीकरण बंद ठेवलं आहे. “किमान आपल्याच ताब्यात असलेल्या महानगरपालिकेने काढलेल्या या पत्रावर तरी भाजपाने विश्वास ठेवावा आणि महाराष्ट्राला पुरेशी लस उपलब्ध करून द्यावी!” असं पवार म्हणालेत. केंद्राकडून लसींचा पुरवठा वाढवून मिळावा यासाठी प्रयत्न करणं हे राजकारण आहे का? राज्याला तातडीने अधिक लस मिळाव्यात याला विरोध आहे का? असे प्रश्नही त्यांनी विरोधकांना विचारले.

Exit mobile version