Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोतीबिंदू तपासणी शिबिर

बोदवड – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील जलचक्र बुद्रुक येथे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत मोतिबिंदू तपासणी शिबिर संपन्न झाले.

यावेळी ११७ लोकांची तपासणी झाली. यात मोतिबिंदुचे २१ रुग्ण, पडद्याचे ६ रुग्ण, नासुरचे ४ अशा एकूण ३१ रुग्णांवर शस्त्रक्रिया होणार आहे. मोहनराव नारायणा नेत्रालय नांदुरा येथे पुढील उपचार होणार आहेत.

दि. १४ सप्टेंबर रोजी आमदार चंद्रकांत पाटिल यांचा वाढदिवस विविध सामाजिक कार्यक्रमाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांकडून साजरा होत असतो. यावेळी आमदारांनी व्हिडिओ कॉलद्वारे यांनी शिबिराचा आढावा घेतला. प्रसंगी नगराध्यक्ष आनंदा पाटील, माजी जि.प.सदस्य डॉ. उद्धव पाटील, नगरसेवक सुनिल बोरसे, गोपाळ पाटील यांनी भेट दिली.

कार्यक्रमाचे आयोजन आमीन मुलतान, जिलानी मुलतानी सोमेश्वर पाटील,  नितीन पाटील यांनी केले असून जिलानी मुलातानी, धनराज पाटील, अमोल पाटील, नितीन ईंगळे, मयुर पाटील, विजय सपकाळ, अक्षय पाटील, प्रतीक पाटील, संदिप पाटील, चेतन पाटील, गजानन राऊत, रमजान मुलतानी, फिरोज मुलतानी, जीवन पाटील, ईश्वर शळके, पंडित घुले, योगेश पाटील, अरुण गोसावी, संतोष खरे, उमेश पाटील आदींचे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.

Exit mobile version