Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

संचारबंदीत लोकांना ओळखपत्र देण्याचा आमदारांना अधिकार आहे का ? : दिपककुमार गुप्ता यांची पंतप्रधानांकडे ट्विटद्वारे तक्रार

जळगाव, प्रतिनिधी । देशात लॉक डाऊन जाहीर करण्यात आला असून या कालावधीत अत्यावश्यक सेवा देणाऱया लोकांनाच घरा बाहेर पडता येत आहे. मात्र, ही अत्यावश्यक सेवा देतांना सक्षम अधिकारी यांच्या स्वाक्षरीचे ओळख पत्र असणे सक्तीचे करण्यात आले आहे. जळगाव शहराचे आमदार पंतप्रधानांच्या आदेशाचा अवमान करत स्वतः च्या सही शिक्का असलेले ओळखपत्र वाटप करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला असून याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते दिपककुमार गुप्ता यांनी ट्विटरद्वारे पंतप्रधान, केंद्रीय गृह मंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदींकडे केली आहे.

 

संचारबंदी काळात काही स्वयंसेवी संस्था ह्या गरीब व गरजू लोकांना अन्न वाटप करत आहेत. या संस्थांच्या सदस्यांना सक्षम अधिकारी म्हणून तहसीलदार ओळख पत्र देत आहेत. तर काही जणांना आमदार सुरेश भोळे यांनी ओळख पत्र दिल्याचे दिसून येत आहे. आमदारांना अशा प्रकारचे ओळख पत्र देण्याचा अधिकार नसतांना त्यांनी ओळख पत्र दिल्याने माहिती अधिकार कार्यकर्ते दिपककुमार गुप्ता यांनी याबाबत ट्वीट केले आहे. हे ट्विट त्यांनी पंतप्रधान कार्यालय, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह मंत्री अमित शाह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आदींना टॅग केले आहे. आमदार हे संचारबंदीमध्ये पास इश्यू करत आहेत. ते लोकांना घराबाहेर पडण्यास प्रोत्सहन देत आहेत. अशा प्रक्रारे पासचे वाटप करण्याचा अधिकार आमदारांना आहे का असा प्रश्न गुप्ता यांनी ट्विटद्वारे विचारला आहे.

Exit mobile version