Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आप आमदाराच्या विजयी मिरवणुकीत गोळीबार ; एकाचा मृत्यू

Gun fires

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) महरौली विधानसभा क्षेत्रातून विजयी झालेले आप आमदार नरेश यादल यांच्या विजयी मिरवणुकीत दोघांवर गोळीबार करण्यात आला. या घटनेत एकाचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर व्यक्ती जखमी झाला आहे. दरम्यान, मला हल्ल्याचे कारण माहित नाही. पण हे अचानक झाले. जवळपास चार राऊंड फायरिंग करण्यात आले, अशी माहिती आमदार नरेश यादवांनी दिली आहे.

 

मंगळवारी दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. यामध्ये नरेश यादव एकूण 62,417 मतांनी विजयी झाले. त्यांनी भाजप कुसुम खत्री यांचा पराजय करून विजय मिळवला. कुसुम खत्री यांचा 44,085 मतांनी पराजय झाला. नरेश यादव यांचा ताफा महिपालपुरकडे जात असताना अरूणा आसफ अली मार्गावर हा गोळीबार करण्यात आला. त्ग्यात अशोक मान या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. तर आणखी एक कार्यकर्ता जखमी झाला आहे. हा गोळीबार आमदार नरेश यादव विजयानंतर मंदिरातून बाहेर येत होते, त्यावेळी झाला.

Exit mobile version