Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आपापसातील भांडणातून बाप लेकाला मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील पिंप्राळा हुडको येथे भांडणातून बाप लेकाला तीन जणांनी मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी मंगळवारी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

 

पिंप्राळा हुडको येथे पोलीस चौकीच्या मागील बाजूस युसूफ शेख युनूस वय ४० हे वास्तव्यास आहेत. बुधवारी दुपारी युसूफ हे घरी असताना घराजवळ राहणारे आरीफ असलम, अलताफ असलम, आबीद असलम हे तिघे जण आले, त्यांनी आपसातील भांडणाच्या कारणावरुन युसूफ व त्यांचा मुलगा या दोघांना शिवीगाळ करत मारहाण केली, यादरम्यान आरीफ असलम याने युसूफ यांच्या डोक्यात काठी मारुन दुखापत केली, या घटनेत युसूफ शेख हे जखमी झाले आहे. याप्रकरणी जखमी युसूफ शेख यांच्या तक्रारीवरुन आरीफ असलम, अलताफ असलम, आबीद असलम या तिघांविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस पोलीस हेडकॉन्स्टेबल विकास महाजन हे करीत आहेत.

Exit mobile version