Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आपापल्या घरासमोर नागरिकांनी 22 तारखेला राज्य सरकारचा निषेध करावा : चंद्रकांत पाटील

मुंबई (वृत्तसंस्था) मेरा अंगण मेरा रणागंण महाराष्ट्र बचाव अशा प्रकारची भूमिका घेऊन महाराष्ट्रातल्या लाखो लोकांनी 22 तारखेला आपापल्या घरासमोर सोशल डिस्टन्सिंगचे भान ठेवून राज्य सरकारचा निषेध करावा, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

 

चंद्रकांत पाटील म्हणाले, महाराष्ट्रात पहिला कोरोना रुग्ण 9 मार्चला सापडला. त्याच दिवशी केरळमध्ये पहिला रुग्ण सापडला. केरळाची संख्या 70 दिवसात 1 हजार क्रॉस झालेली आहे आणि महाराष्ट्रातील 70 दिवसाची संख्या ही 40 हजार झाली आहे. केरळमध्ये मृतांची संख्या 12 क्रॉस झालेली नाही. पण महाराष्ट्रातली मृत्यूची संख्या 1300 क्रॉस होऊन 1400 कडे निघाली आहे. याचा अर्थ महाराष्ट्रातील ठाकरे सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचे उदाहरण आहे. त्यामुळे 22 तारखेला मेरा अंगण मेरा रणागंण महाराष्ट्र बचाव अशा प्रकारची भूमिका घेऊन महाराष्ट्रातल्या लाखो लोकांनी आपल्याला आपल्या घरासमोर सोशल डिस्टन्सिंगचे भान ठेवून राज्य सरकारचा निषेध करावा. यावेळी निषेध व्यक्त करणारे रिप्लेक्शन म्हणून काळे बोर्ड, काळे टी शर्ट, काळी रीबीन, काळे मास्क, काळे शर्ट, काळ्या ओढण्या अशा गोष्टींचा वापर करावा, असे आवाहन देखील चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

Exit mobile version