Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आपला जिल्हा, आपले उपक्रम’ या डिजिटल बुकचे जि.प. अध्यक्षांच्या हस्ते प्रकाशन

पाचोरा प्रतिनिधी । ‘आपला जिल्हा, आपले उपक्रम’ या डिजिटल बुकचे जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील यांच्या दालनात प्रकाशन करण्यात आले. त्याप्रसंगी या ई – पुस्तकातील उपक्रम राबविणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन करत यातील उपक्रम इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन अध्यक्षीय भाषणात जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील यांनी केले.

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग अंतर्गत प्राथमिक शिक्षणाधिकारी बी. एस. अकलाडे यांच्या मार्गदर्शनाखाली “आपला जिल्हा – आपले उपक्रम” हे ई – पुस्तक तयार करण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम लॉक डाऊनच्या काळात राबविण्यात आला होता. या पुस्तक प्रकाशन प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील, शिक्षण व क्रीडा समिती सभापती  रविंद्र पाटील, समाजकल्याण सभापती जयपाल बोदडे, मधुकर काटे, प्रल्हाद पाटील, राकेश पाटील, प्रमोद सावकारे, नाना महाजन, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बी. एस. अकलाडे, प्रभारी उपशिक्षणाधिकारी विजय पवार, राजेंद्र सपकाळे, शिक्षण विस्तार अधिकारी सरला पाटील, स्वीय सहाय्यक पी. आर. चौधरी, संदिप पवार, दिलीप पाटील, कल्पना पाटील, अरुणा उदावंत, सोनाली साळुंखे, राहुल चौधरी, सुनिल दाभाडे, प्रभात तडवी, चंद्रकांत महाजन, विलास निकम उपस्थित होते. याप्रसंगी नव्याने प्रभारी उपशिक्षणाधिकारी पदी निवड झालेल्या विजय पवार व राजेंद्र सपकाळे यांचा सत्कार करण्यात आला. सूत्र संचलन संदीप पवार यांनी केले. 

या उपक्रमासाठी पालक मंत्री  गुलाबराव पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील, उपाध्यक्ष लालचन्द पाटील तसेच शिक्षण सभापती रविंद्र पाटील, समाजकल्याण सभापती जयपाल बोदडे, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, डायट प्राचार्या मंजुषा क्षीरसागर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) बी. जे. पाटील, निरंतर शिक्षणाधिकारी के. ए. पाटील यांचे शुभेच्छा संदेश प्राप्त झाले आहेत. भाग तीन पुस्तकात शिक्षकांचे अभिनव उपक्रम समाविष्ट केलेले असून त्यापासून इतरांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने जिल्ह्यातील शिक्षकांकडून लॉकडाउनच्या कालावधीचा उत्कृष्टरित्या उपयोग करून घेतला व लेखन कौशल्य प्रोत्साहन दिले. मोठा प्रतिसाद या उपक्रमाला मिळालेला आहे.

 डिजिटल बुक भाग – ३ पुस्तकाच्या निर्मितीसाठी संदिप पवार, राजेंद्र कोळी, सोनाली साळुंखे, रत्नाकर पाटील, विजया पाटील, कल्पना पाटील, पंकज पालीवाल, संभाजी हावडे, राहुल चौधरी, सुनील दाभाडे, मनोहर तेजवानी, अरुण पाटील, विलास निकम, ईश्वर महाजन इत्यादी शिक्षकांनी सहकार्य केले. तसेच जिल्ह्यातील सर्व उपशिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख या सर्वांचे सहकार्य लाभले. प्रास्ताविक विजय पवार यांनी तर आभार राजेंद्र सपकाळे यांनी मानले.

Exit mobile version