Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आधी सोडवला पेपर, नंतर दिला वडिलांना मुखाग्नी !

चोपडा प्रतिनिधी । येथील दीपक सुरेश बोरसे या विद्यार्थ्याने आधी बारावीचा आजचा पेपर देऊन नंतर वडिलांना मुखाग्नी दिला असून या धैर्याबद्दल त्याचे कौतुक होत आहे.

याबाबत वृत्त असे की, महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचालित कला,शास्र व वाणिज्य महाविद्यालयात सेंटर क्र.८४० येथे पंकज विद्यालय चोपडा १२ विज्ञान वर्गातील विद्यार्थी दिपक सुरेश बोरसे यांचे वडील सुरेश शांतीलाल बोरसे, (शासकीय माध्यमिक विद्यालय वरला येथिल शिक्षक) यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले डोक्यावर डोंगराएवढे दुःख कोसळले असतांना दिपकने बोर्डाचा पूर्व नियोजीत जीवशास्र विषयाचा ११ ते ०२ या वेळेत पेपर दिला. या वेळी उपकेंद्रसंचालक व पर्यवेक्षक प्रा.व्ही.वाय.पाटील,प्रा.एस.पी.पाटील,प्रा.एन.बी.शिरसाठ,यांनी विद्यार्थ्यांचे सांत्वन केले.
चोपडा येथील हेमलता नगरातील रहिवासी असणारे सुरेश बोरसे यांच्या पश्‍चात पत्नी,मुलगी व मुलगा असा असा परिवार आहे. दीपकच्या जिद्दीला लोकांनी सलाम केला असून त्याचे सांत्वनदेखील केले आहे.

Exit mobile version