Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आधी ८६ कोटींची थकबाकी द्या, मगच मसाकाची विक्री करा !

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील मधुकर सहकारी साखर कारखान्याला जिल्हा बँकेकडून आज कर्जवसुलीसाठी विक्री प्रक्रीयेचा शेवटचा दिवस आले आहे. दरम्यान आधी ८६ कोटींची थकबाकी द्या नंतर त्याची विक्री करा अशी मागणी यावल तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी व कर्मचाऱ्यांनी केली आहे.

यावल तालुक्यातील न्हावी (फैजपुर) येथील मधुकर सहकारी साखर कारखाना मागील वर्षापासुन जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या कर्जफेडी मुळे चांगला आर्थिक गोंधळात सापडला असुन, जिल्हा बँकेच्या माध्यमातुन कर्ज वसुलीसाठी हा साखर कारखाना एका खाजगी कंपनीस ६१ कोटी रूपयांमध्ये विक्री करण्याचा निर्णय झाला असुन, खरेदी करणाऱ्या कंपनी व्दारे ६ कोटी २५ लाख रुपये सौदे पावती डिपॉझीट म्हणुन जमा केले आहे . आज ९ फेब्रुवारी २०२३ रोजी मसाका विक्री प्रक्रियाची शेवटची मुदत असून, संबधीत खरेदी करणाऱ्या कंपनीकडुन उर्वरीत रक्कम जमा न झाल्यास ही खरेदी व्यवहार रद्द होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

मसाकाच्या विक्रीचा घाट जळगाव जिल्हा सहकारी बँकेने घातल्यापासुन मोठया प्रमाणावर या कारखाना विक्री विरोध झाला असुन, हा कारखाना ज्यांच्या जिवावर मोठा झाला असे उस उत्पादक करणारे शेतकरी, उसतोड मजुर,वाहतुकदार व कारखान्यावर स्थापनेपासुन आपली अखंड सेवा देणारे अधिकारी व कर्मचारी या सर्व मंडळीचे मसाकावर ८६ कोटी८६ लाख७७ हजार रूपये घेणे बाकी आहे अशा गंभीर आर्थिक अवस्थेता निर्माण झाली असून आधी जिल्हा बँकेने या कारखान्याशी निगडीत असलेल्या सर्वांचे देणे द्यावे नंतर कारखाना विक्री काढावा अशी मागणी विविध सामाजिक संस्था, उस उत्पादक शेतकरी व कर्मचारी यांच्याकडून करण्यात येत आहे .

Exit mobile version