आधीच दौरे केले असते तर आज ही वेळ आली नसती – आ. गुलाबराव पाटील

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स  न्यूज प्रतिनिधी |  उद्धव ठाकरे तसेच आदित्य ठाकरे यांनी आधीच हे दौरे केले असते तर कदाचित ही वेळ आली नसती असा टोला एकनाथ शिंदे गटात सहभागी माजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी लगावला. ते युवा सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर बोलत होते.

 

आमदार गुलाबराव पाटील यांनी ‘एकच ध्यास शहराचा विकास’ हे ध्येय ठेवून सत्तेपेक्षा या शहराचा विकास करणे गरजेचे आहे.   पावसाळा संपल्यानंतर मंजूर झालेले कामे न करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून फौजदारी गुन्हे दाखल करण्यात याव्यात अशी सूचना जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्याची माहिती माजी पालकमंत्री आ. गुलाबराव पाटील यांनी दिली.   शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना शिवसेनेच्या शाखांवर फिरावं लागत आहे यासारख आज दुसरे दुर्दैव नाही. उद्धव ठाकरे तसेच आदित्य ठाकरे यांनी आधीच हे दौरे केले असते तर कदाचित ही वेळ आली नसती असे माजी पालकमंत्री  गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले आहे.  युवा सेनेत काम करत असतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.  पक्षात नवीन आलेल्यांना अधिक संधी दिली जात असल्याचा आरोप करत  युवासेनेचे पदाधिकाऱ्यांसह २०० तरूणांनी राजीनामा दिला असून  माजी पालकमंत्री आ. गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे गटात सामिल  झाले असल्याचे युवासेना जिल्हाप्रमुख शिवराज पाटील यांनी  स्पष्ट केले आहे.

 

 

भाग १

भाग २

भाग 3

Protected Content