Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आदेश डावलून लिलाव ; सुमारे ५ लाखाचा भाजीपाला जप्त

 

भुसावळ, प्रतिनिधी । शहरातील आठवडे बाजारात भाजीपाला लिलाव व विक्रीस मनाई असतांना सोशल डिस्टन्सिंग न पाळता भाजीपाल्‍याचा लिलाव केल्‍याप्रकरणी पथकाने सुमारे ५ लाखाचा भाजीपाला जप्‍त केला आहे.

प्रांत रामसिंग सुलाणे,उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड,नगरपरिषदेच्‍या मुख्याधिकारी करुणा डहाळे, बाजारपेठ पोलीस ठाण्‍याचे पोलिस निरिक्षक दिलीप भागवत यांच्‍या मार्गदर्शनाखाली नगरपरिषद,महसुल व पोलीस पथकातील अधिकारी,कर्मचाऱ्यांनी आज पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास गुप्त माहितीवरून आठवडे बाजारात गेले असता तेथे मनाई असतानाही लिलाव सुरू होता. पथकाने सुमारे ५ लाखांचा भाजीपाला जप्‍त करुन १७-१८ वाहनेही ताब्‍यात घेतले. जप्त केलेला भाजीपाला कोरोनाच्या काळात गरीब व गरजु लोकांना जेवणाची सुविधा करणा-या नोंदणीकृत स्‍वंयसेवी संस्‍थांना देण्‍यात येणार असल्‍याचे प्रांत रामसिंग सुलाणे,मुख्‍याधिकारी कल्‍पना डहाळे यांनी सांगितले. गेल्या आठवड्यापासुन पालिकेने पथके स्थापन केली असून त्यांनी दंडात्मक कारवाई व काही गुन्‍हे दाखल केले होते.मात्र या धडक कारवाई मुळे एकच खळबळ उडाली आहे. रस्त्यांवर आता अतिरिक्त पोलिस कुमक उतरवण्यात आली आहे. नगरपरिषदेच्‍या माध्यमातुन शहरातील सर्व वार्ड,गल्ल्यांमध्ये जाऊन लाऊड स्पिकरद्वारे सकाळी ११ ते ३ या काळात फक्त अत्यावश्यक सेवांची दुकानेच चालु राहत असून,अशी सुचना नागरिकांना दिली जात आहे.

Exit mobile version