Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आदिवासी एकता परिषदेच्या उपोषणाची सांगता (व्हिडिओ)

यावल  : प्रतिनिधी  । येथे आदिवासी  एकता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी सुरु केलेल्या उपोषणाची आज सहाव्या दिवशी आदिवासी विकास आयुक्तांनी दिलेल्या आश्वासनानंतर सांगता झाली

 

येथील एकात्मीक आदीवासी प्रकल्प विकास कार्यालयासमोर जळगावच्या शासकीय मुलांचे वस्तीग्रुह येथील नवीन पाणी पुरवठा योजनेत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला होता आमदार शिरीष चौधरी यांनीही उपोषणकर्त्यांची भेट घेवुन चर्चा केली होती  चौकशी होईल व जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल असे आश्वासन दिले होते .

 

यावल येथील आदीवासी एकात्मीक प्रकल्प विकास कार्यालयासमोर आदीवासी एकता परिषदचे जिल्हाध्यक्ष करण सोनवणे व त्यांचे सहकारी यशवंत अहीरे , महेन्द्र मोरे , कृष्णा मोरे यांनी हे उपोषण सुरु केले होते  विविध पक्षांनी या उपोषणाला  पाठींबा दिला होता

 

उपोषणकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर आमदार शिरीष चौधरी यांनी आदीवासी विकास आयुक्त संदीप गोगई यांना  यावल येथे सुरू असलेल्या उपोषणाबाबतची माहीती दिली आयुक्त संदीप गोगई यांनी या उपोषणाची गंभीर दखल घेतली समितीचा चौकशी अहवाल कार्यालयास सादर झाला असुन निकाल आपण त्वरीत लावणार आहोत असे पत्र उपोषणकर्त्यांना पाठवले आहे   त्यानंतर या उपोषणांची जिल्हा प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांच्या उपस्थितीत सांगता झाली .

 

 

 

Exit mobile version