Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आदीलशाह फारूकी बहुउद्देशिय संस्थेतर्फे खान्देश गौरव पुरस्काराचे वितरण

adavat

 

चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील अडावद येथील आदिलशाह फारुकी बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रातील 35 मान्यवरांना खान्देश गौरव पुरस्कार देऊन नुकतेच गौरविण्यात आले आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री गुलाबराव देवकर होते. यावेळी महाराष्ट्रच्या विविध जिल्ह्यातील मान्यवर उपस्थित होते. दीपप्रज्वलन अंकुर साहित्य परिषदेचे सहसचिव हकीम चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष फारुख शहा नौमानी यांनी सादर केले. तसेच सुरेश बोरसे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

यावेळी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कृषी, पत्रकारिता, लेखन, काव्य आदी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. तसेच मराठी पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष प्रवीण पाटील, जावेद शेख, अली अंजुम रिझवी, दिगंबर पाटील (अडावद) यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमामध्ये रियाझ शेख (नागपूर), नुरुद्दीन मुल्लाजी (कासोदा), सुनीता अशोकराव (नागपूर), फिरोज शेख (जळगाव), गणेश परदेशी, हारून अन्सारी, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शेख जाविद यावल, शेख अय्युब यावल, जुबेर शाह यांनी अथक परिश्रम घेतले.

Exit mobile version