Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आदिवासीसह भिल्ल समाजाच्या विविध मागण्यांचे एकलव्य संघटनेचे निवेदन

पारोळा प्रतिनिधी । येथील आदिवासी तसेच भिल्ल समाजाला रेशन कार्ड तसेच खावटी कर्ज मिळावे यासह विविध मागण्यांसाठी यासंदर्भात येथील भिल्ल आदिवासी समाज एकलव्य संघटनेने तहसीलदार अनिल गवांदे, पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे, गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले.

संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना विषाणूचा उद्भवलेल्या भयानक परिस्थितीत आर्थिक,सामाजिक व शैक्षणिक संकटात सापडलेल्या आदिवासी समाजाला आदिवासी विभागाकडून अर्थसहाय्य व कर्जाच्या माध्यमातून खावटी कर्ज सहित आर्थिक सहाय्य मिळावे. तसेच आदिवासी विकास विभाग शासन निर्णयानुसार शिधापत्रिका वाटप करण्यात यावे तसेच आदिवासी समाजातील लोकांना जातीचे दाखल्यांचे वाटप घरपोच करण्यात यावे. तसेच आपल्या तालुक्यात आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे तरी सर्व आदिवासी समाजाची कोरोणा विषाणूचा उद्भवलेल्या भयानक परिस्थितीत आर्थिक सामाजिक व शैक्षणिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून त्या आदिवासी समाजाला जीवन जगणं अत्यंत कठीण झाले आहे.

आदिवासी विभाग व शासनाच्या वतीने आदिवासी समाजाला खावटी कर्जाच्या माध्यमातून खावटी कर्ज सहित आर्थिक सहाय्य मिळावे. वरील आदिवासी समाजाच्या मागण्यांच्या तात्‍काळ विचार करून आदिवासी समाजाला सहकार्य करावे अन्यथा शिवाजीराव ढवळे प्रदेशाध्यक्ष (म्हाडा सभापती) यांच्या आदेशान्वये व जिल्हाध्यक्ष सुधाकरराव वाघ यांचे नेतृत्वाखाली आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात जिल्हाभर रस्त्यावर उतरून आंदोलनात्मक पवित्रा घेतल्याशिवाय राहणार नाही असे निवेदनात म्हटले.

निवेदनावर यांच्या आहेत स्वाक्षऱ्या
पारोळा तालुका एकलव्य संघटना अध्यक्ष रवींद्र गायकवाड, विनोद मोरे, सुनिल गायकवाड, ज्ञानेश्वर मोरे, अनिल अहिरे, सुनील सोनवणे , किसन मोरे, मुकुंदा मोरे, सिताराम गायकवाड यांच्यासह आदिवासी बांधवांच्या स्वाक्षऱ्या होत्या. दरम्यान, प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी गावनिहाय याद्या व भरलेल्या अर्जावरील कुटुंबा नुसार मोफत रेशन कार्ड देण्याचे आश्वासन दिले तसेच यावल येथील आदिवासी प्रकल्प कार्यालयाशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून खावटी कर्जाचे अर्ज प्रांत कार्यालयातून यावल प्रकल्प कार्यालयाला सादर करण्याचे आश्वासन प्रांताधिकारी यांनी यावेळी दिले.

Exit mobile version