Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आदर्श नगरातून चार लॅपटॉपची चोरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मोहाडी रोडवरील आदर्श नगरात एका ठिकाणाहून ६८ हजार रूपये किंमतीचे चार लॅपटॉपची चोरी झाल्याचे उघडकीला आले आहे. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, केशव अरूण दिवसे (वय-२२) रा. दकरखेडा ता. मलकापूर जि.बुलढाणा हा तरूण शिक्षणासाठी आदर्श नगर, मोहाडी रोड, जळगाव राहत आहे. त्याच्यासोबत त्याचे काही मित्र देखील सोबत राहतात. सोमवारी २२ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३० ते ९.३० वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने त्यांच्या खोलीत असलेले ६८ हजार रूपये किंमतीचे चार लॅपटॉप चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. त्यांनी परिसरात सर्वत्र शोधाशोध केली परंतू कुठेही काहीही आढळून आले नाही. याबाबत अखेर त्यांनी बुधवार २५ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक रेवानंद साळुंखे करीत आहे.

Exit mobile version