Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आदर्शनगरात घरफोडी; साडेतीन लाखांचा मुद्देमाल लंपास

chori

जळगाव प्रतिनिधी । शहरातील आदर्शनगर येथे राहणारे कुटुंबिय मंगळवारी यावल येथे गेल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी बंद घरातील हातसफाई करत साडेतीन लाख रुपयांचे दागिने व 15 हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लांबवली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, जिल्हा सबट्रेझरी ऑफीसर नसिम हाजी हमीद तडवी (वय ४५, रा.आदर्शनगर) यांच्या घरी ही घरफोडी झाली आहे. तडवी हे मंगळवारी 21 रोजी सायंकाळी 5.30 वाजता पत्नीसह यावल येथे नातेवाईकांकडे निधन झालेले असल्याने धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते. तर त्यांची मुलगी आएशा ही जळगावातच आजीकडे झोपण्यासाठी गेली होती. त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. यानंतर टॉमीच्या साह्याने दोन लोखंडी कपाटे फोडून त्यातील साडेतीन लाख रुपयांचे सोने, चांदीचे दागिने व १५ हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. बुधवारी सकाळी 7.30 वाजता आऐशा आजीच्या घरून आदर्शनगरातील घरी आली. यावेळी घराचे बाहेरील कुलूप तोडलेले दिसून आले. आत जाऊन पाहणी केली असता घरात चोरी झाल्याचे निष्पन्न झाले. यानंतर तीने वडील तसेच पोलिसांना फोन करून माहिती दिली. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version