Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या दोन महिलांना न्यायालयीन कोठडी

जळगाव प्रतिनिधी । विवाह करण्यासाठी १ लाख रूपयांत फसवणूक करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात नववधूसह दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील दोन महिलांना अटक करण्यात आली असून दोघांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, शहरातील एमआयडीसीतील चटई कंपनीत काम करणारा कैलास संतोष चवरे रा. सामसोद ता.जामनेर हा जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील आपल्या बहिणीकडे गेल्या १२ वर्षांपासून राहत होता. चार वर्षांपुर्वी संतोष याचा घटस्पोट झालेला आहे. दरम्यान, दुसरा विवाह करण्यासाठी आई, बहिण आणि मेहुणे यांची मुलगी शोधण्याचे काम सुरू होते. जळगाव शहरातील शनिमंदीराजवळ राहणारी लिलाबाई उर्फ भाभी (पुर्ण नाव माहित नाही) हिने मलकापूर येथील लग्न जुळविणारी उज्वलाबाई उर्फ संगिताबाई यांनी १ लाख रूपये घेवून ३० जुलै रोजी सकाळी मलकापूर येथील एका १८ वर्षीय मुलीशी लग्न लावून दिले. त्याच ठिकाणी कैलास याच्या नातेवाईकांनी ४० हजार आणि ६० हजार असे दोन टप्प्यात १ लाख रूपये भाभी आणि संगिताबाई यांना दिले. दरम्यान दुसऱ्या दिवशी ३१ जुलै रोजी नववधु (पुर्ण नाव माहित नाही) कुसुंबा येथे असतांना सकाळी ११ वाजता कैलासचा मोबाईल घेवून पसार झाली. नववधूने पळ काढल्याचे लक्षात आल्यानंतर गावात राहणारी लिलाबाई उर्फ भाभी हिच्याकडे येवून फसवणूक केल्याचे सांगत कैलास याने दिलेले १ लाख रूपये परत कर असे सांगितले. नाहीतर आपल्या जीवाचे बरेवाईट करून घेईल असे सांगितले. दरम्यान, कोणत्याही परिस्थिती तुला पैसे मिळणार नाही, तुला जे करायचे आहे ते कर असे लिलाबाई हिने सांगितल्यानंतर कैलासने ७ ऑगस्ट रोजी नैराश्येतून शनीमंदीराजवळील पोलीस चौकीच्या बाजूला असलेल्या ओट्यावर विषारी औषध घेवून आत्महत्या केली. दरम्यान याप्रकरणी २८ ऑगस्ट रोजी मयत कैलास चवरे यांचे मेहुणे संतोष पाटील (वय-३२) रा. कुसुंबा ता.जि.जळगाव यांच्या फिर्यादीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात नववधूसह लिलाबाई उर्फ भाभी, संगिताबाई उर्फ उज्जवलाबाई (पुर्ण नाव माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर शनीपेठ पोलीसांनी लिलाबाई उर्फ भाभी, संगिताबाई उर्फ उज्जवलाबाई यांना ७ सप्टेंबर रोजी अटक केली. नववधू अद्याप फरार आहे. आज न्यायालयात हजर केले असता दोघांना न्यायालयीन पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

Exit mobile version