Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आत्मनिर्भर भारत: डीआरडीओ ने विकसित केली जगातील सर्वोत्तम हॉवित्झर तोफ

 

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । स्वदेशी बनावटीची ए टी ए जी एस हॉवित्झर ही जगातील सर्वोत्तम तोफ आहे. दूरवरच्या ४८ किलोमीटर अंतरापर्यंतच्या लक्ष्यावर प्रहार करण्याची या तोफेची क्षमता आहे असे संरक्षण संशोधन विकास संस्था म्हणजे डी आर डी ओच्या वैज्ञानिकाने सांगितले.

“स्वदेशी बनावटीची ही तोफ भारतीय लष्कराच्या सर्व गरजा पूर्ण करु शकते. या क्षेत्रात आयातीची आवश्यकता नाही” असे ATAGS हॉवित्झर तोफ प्रकल्पाचे संचालक आणि डीआरडीओचे वरिष्ठ वैज्ञानिक शैलेंद्र व्ही गाडे फिल्ड चाचणी दरम्यान म्हणाले.

“चीन सीमेजवळ सिक्कीम आणि पाकिस्तान सीमेजवळ पोखरण येथे चाचणी दरम्यान ATAGS हॉवित्झरमधून दोन हजार राऊंडस फायर करण्यात आल्या आहेत” असे गाडे यांनी सांगितले. “भारतीय लष्करात वापरात असलेली बोफोर्स आणि इस्रायलने जी ATHOS तोफ देण्याची तयारी दाखवलीय, त्यापेक्षा स्वदेशी ATAGS हॉवित्झरमधील सिस्टिम अधिक चांगली आहे” असे गाडे म्हणाले.

कारगिल युद्धात पाकिस्तानवरील विजयात बोफोर्स तोफांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. ATAGS हॉवित्झर डीआरडीओने विकसित केली आहे.

Exit mobile version