आत्मनिर्भर निधीतून लहान व्यावसायिकांना मुख्य प्रवाहात आणणार – खासदार उन्मेश पाटील

भडगाव प्रतिनिधी । लॉकडाऊनच्या काळात पथविक्रेत्यांचा उपजीविकेवर विपरीत परिणाम झाला आहे. लॉकडाऊनमध्ये पथविक्रेत्यांचा व्यवसाय बंद असल्यामुळे त्यांच्याजवळ खेळते भांडवल नसल्याने व्यवसाय अडचणी आले आहे. केंद्र सरकारने बारा बलुतेदार व्यावसायिकांसाठी आत्मनिर्भर निधीतून लहानतला लहान व्यावसायिकांना मुख्यप्रवाहात आणणार असल्याचे प्रतिपादन खासदार उन्मेश पाटील यांनी केले.

खासदार उन्मेश पाटील यांच्या पुढाकारातून पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेच्या जनजागृती अभियानाचा भडगाव येथील शासकीय विश्रामगृहात आज सकाळी ११ वाजता शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. पुढे बोलतांना ते म्हणाले की, अर्थव्यवस्थेच्या महत्वाचा घटक असलेल्या पथविक्रेत्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी आत्मनिर्भर निधीची घोषणा केल्याने या योजनेतून जळगाव जिल्ह्यातील पथविक्रेते, फेरीवाले, हातगाडी विक्रेते, भाज्या, फळे, तयार खाद्य पदार्थ, चहा, भजी पाव, अंडी, कापड, वस्त्र, चप्पल, कारागीर द्वारा उत्पादित वस्तू विक्रेता पुस्तक स्टेशनरी तसेच केश कर्तनालय, चर्मकार, पान दुकाने, कपडे धुलाई व लॉड्री दुकानदार असे लहान मोठे बारा बलुतेदार व्यावसायिकांना आत्मनिर्भर करण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरु करण्यासाठी खेळते भांडवलाचा पुरवठा तातडीने करण्यासाठी १० हजार रूपयांपर्यंत खेळते भांडवल देण्याचा निर्णय घेतला आहे. यांचा लाभ जळगाव लोकसभेतील सर्व शहरात राहणारे आणि ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या पथविक्रेत्यांनी लाभ व्हावा. आत्मनिर्भर निधीतून लहानातून लहान व्यावसायिकांना नवसंजीवनी देण्याचा माझा प्रयत्न असून यासाठी प्रत्येक शहरात जनजागृती अभियान सुरू केले आहे. असे प्रतिपादन खा. पाटील यांनी केले आहे.

खेळते भांडवल योजनेचा भडगाव जनतेने लाभ घेण्याचे आवाहन
खासदार उन्मेश दादा पुढे म्हणाले की, योजना हि १०० टक्के केंद्र सरकार पुरस्कृत आहे. शहरातील पथविक्रेते व ग्रामीण भागातुन शहरात येणारे पथविक्रेते यांना १० हजार रूपयांपर्यंत खेळते भांडवल पुरवठा करण्यात येणार असून अतिशय सोपी प्रक्रिया भरून यात तात्पुरते विक्री प्रमाणपत्र, आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदान कार्ड, बॅंक पास बुक झेरॉक्स हे घेऊन आपल्या शहरातील जवळचे ई सेवा केंद्र, सीएससी सेंटर येथे जावून ही माहिती भरावायची आहे. यासाठी कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होवून आपला व्यवसाय पुन्हा जोमाने सुरू करावा. आत्मनिर्भर निधीतून लहानातून लहान व्यावसायिकांना मुख्य प्रवाहात आणावयाचे असल्याचा विश्वास त्यांनी उपस्थित शहरवासीयांना दिला.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी भाजप तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, भडगाव तालुकाध्यक्ष नगरसेवक अमोल पाटील, पालिका मुख्याधिकारी विकास नवाळे, माजी जि.प. सदस्य श्रावण लिंडायत, भाजप जेष्ठ पदाधिकारी तथा पत्रकार सोमनाथ पाटील, नाभिक समाज विभागीय अध्यक्ष नाना शिरसाठ, पत्रकार संजय पवार, तालुका सचिव अनिल पाटील, शैलेश पाटील, बन्सी परदेशी, प्रदीप कोळी, प्रदीप सोमवंशी, शुभम सुराणा, शेखर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीला भडगाव तालुकाध्यक्ष अमोल नाना पाटील प्रास्ताविकात आजच्या अभियानाबद्दल माहिती दिली. यावेळी पाचोरा भाजप तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.

Protected Content