Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आता निर्यात बंदी असलेल्या कंपन्यांकडून रेमडेसिवीर’ घेण्याचे प्रयत्न – टोपे

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । ज्या कंपन्यांच्या निर्यातीवर केंद्र शासनाने बंदी आणली आहे, त्या कंपन्यांनी राज्य शासनाला निर्यातीसाठी तयार केलेला रेमडेसिवीरचा साठा दिला तर या पाच-सात दिवसांत निश्चित आपली कमतरता  दूर होईल.” , असे आज  आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले

 

 

राज्यात एकीकडे संसर्ग वाढत असताना, दुसरीकडे रूग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील ही बाब मान्य केलेली आहे. अनेक ठिकाणी रूग्णांच्या नातेवाईकांना हे इंजेक्शन मिळवण्यासाठी पळापळ करावी लागत आहे. हा पुरवठा वाढवण्यासाठी व राज्य सरकारकडून कोणते प्रयत्न सुरू आहेत, याबाबत आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली.

 

“आता राज्यशासन व केंद्र शासनाच्या अनुषंगाने आम्ही हा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर  घेऊ किंवा मुख्यमंत्रीदेखील केंद्र शासनाशी बोलणं करून, रेमडेसिवीरचे जे निर्यातदार आहेत, ज्यांच्यावर बंदी आहे. हे निर्यातदार त्यांचा माल आपल्याला देऊ शकले किंवा सात कंपन्यांच्या मार्फत देखील देऊ शकले. तरी देखील राज्याच्या अतितातडीच्यादृष्टीने वापरासाठी उपयुक्त ठरू शकते.”  “१५ कंपन्यांना निर्यात बंदी केली आहे, त्यांच्याकडे माल तयार आहे. केवळ त्यांच्या निर्यात बंदी केलेला माल आपल्याला मिळू शकेल का? यासाठीचा प्रयत्न केला जात आहे. तो जर कायदेशीरदृष्टीने यशस्वी झाले तर काही अडचण राहणार नाही.” , असेही ते म्हणाले .

Exit mobile version