Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आठशे रूपयाची लाच भोवली; पोलीस नाईकासह एकास सक्तमजूरीची शिक्षा

जळगाव प्रतिनिधी । खासगी वाहनातून प्रवासी वाहतूक करण्याच्या मोबदल्यात ८०० रूपये घेणारा पोलीस नाईकासह एकाला जळगाव जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्या. पी.वाय.लाडेकर यांनी चार वर्षाची सक्त मजूरीची शिक्षा व दंड ठोठावला आहे.

थोडक्यात घटना याप्रमाणे आहे
तक्रारदार हे चाळीसगावातील कॅप्टन कॉर्नर येथून मारोती ओमनी वाहतनात प्रवासी भरत असतांना पोलीस नाईक आबासाहेब भास्कर पाटील (वय-४४) व मोहन भिका गुजर (वय-५४) यांनी चाळीसगाव येथून प्रवासी वाहतूक करायची असेल तर मागील महिन्याचे व चालू महिन्याचे असे एकुण ८०० रूपयांची मागणी केली होती. याप्रकरणी ३१ मार्च २०१६ रोजी ॲन्टी करप्शन ब्यूरो विभागाला तक्रारदाराने तक्रार केली. चौकशी होवून आबा पाटील आणि मोहन गुजर या दोन्ही संशयितांना रंगेहात पकडले. चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. या गुन्ह्यातील तपासाधिकारी यांनी जळगाव जिल्हा सत्र न्यायालयाने दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर सरकारपक्षातर्फे सहाय्यक वकील भारती खडसे यांनी एकुण ४ साक्षिदार तपासले.

जिल्हा न्यायाधिश पी.वाय.लाडेकर यांनी लाच मागणी केल्याप्रकरणी आरोपी पोलीस नाईक आबा पाटील यास तीन वर्ष सक्तमजूरी व लाच स्वीकारल्याप्रकरणी ४ वर्षे सक्त मजुरी व दोन्ही कामात प्रत्येकी दोन हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली तर सहकारी आरोपी मोहन गुजर याला तीन वर्षाची सक्त मजूरी व हजार रूपये दंड ठोठावला. त्यात तक्रारदार, पंच, सक्षम अधिकारी, तत्कालीन पोलीस अधिक्षक व पोलीस निरीक्षक जगदीश पवार यांची साक्ष महत्वपुर्ण ठरली. त्याकामी पैरवी अधिकारी अनिल सपकाळे, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे केसवॉच सुनिल शिरसाठ यांनी सहकार्य घेतले.

Exit mobile version