Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आज दुपारी रवाना होणार एकनाथराव खडसे

मुक्ताईनगर प्रतिनिधी l राज्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे राष्ट्रवादी प्रवेश करण्यासाठी आज दुपारी मुंबईला रवाना होणार आहेत. तर आज सकाळपासूनच त्यांच्या समर्थकांची प्रचंड गर्दी त्यांच्या निवासस्थानाच्या बाहेर जमलेली आहे.

कालच एकनाथराव खडसे यांनी आपण भाजपचा त्याग करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांच्या पक्षांतराच्या घोषणेमुळे प्रचंड खळबळ उडालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून त्यांच्या प्रवेशाचे स्वागत करण्यात येत आहेत. तर आता एकनाथराव खडसे यांच्या पाठोपाठ त्यांचे समर्थक देखील मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे दिसून येत आहे.

काल एकनाथराव खडसे यांनी आपल्या निवासस्थानी समर्थकांच्या गाठीभेटी घेतल्या आज सकाळी देखील त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने खडसे फार्म हाऊसच्या बाहेर जमलेले आहेत. दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार आज दुपारी साडेबाराच्या सुमारास एकनाथराव खडसे हेलिकॉप्टरने मुंबई येथे रवाना होणार आहेत. तर त्यांचे समर्थक हे चारचाकी वाहनांनी त्यांच्या प्रवेश सोहळ्यासाठी मुंबई येथे जाण्याचा जाणार असल्याचे दिसून येत आहे.

Exit mobile version