Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आजाराला कंटाळून वृद्धाने संपविले जीवन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आजारपणाला कंटाळून अमरेंद्रसिंग रामप्रसादसिंग भदोरिया (वय -५६, रा.मोतीमहल अपार्टमेंट, राधाकृष्ण मंगल कार्यालयाजवळ) यांनी राहत्या घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी १ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील राधाकृष्ण मंगल कार्यालय परिसरातील मोतीमहल अपार्टमेंटमध्ये अमरेंद्रसिंग भदोरिया हे वास्तव्यास होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी असल्याने या आजारपणाला कंटाळून त्यांनी शनिवारी १ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास राहत्या घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ त्यांना शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांची तपासणी करीत त्यांना मयत घोषीत केले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा सून असा परिवार आहे. भदोरिया मुळचे उत्तर प्रदेशातील आहेत. याप्रकरणी रविवारी २ ऑक्टोबर रोजी दुपारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास उपनिरीक्षक प्रदीप चांदेलकर करीत आहेत.

Exit mobile version