Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आजाराला कंटाळून आत्महत्या; पाच दिवसांनी मिळाला मृतदेह

यावल प्रतिनिधी । येथील एका व्यक्तीने आजाराला कंटाळून विहिरीत उडी घेऊन आपली जीवन यात्रा संपली असून पाचव्या दिवशी त्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत विहिरीत दिसून आला.

यासंदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की यावल शहरातील आझादनगर परिसरात राहणारे ५४ वर्षीय मोहम्मद हनीफ बाबू हे दिनांक ३० जुलै रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास खडकाई नदी जवळच्या काठावर शौचासाठी गेले होते. बराच काळ होऊन देखील परत न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली असता काठावर शौचास घेऊन गेलेल्या पाण्याचा डबा दिसून आला.याबाबत पोलिसात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी गावकर्‍यांच्या मदतीने मोहम्मद हनीफ यांचा मृतदेह त्या विहिरीतून काढण्याचा वारंवार प्रयत्न केले असता देखील ते मिळून आले नाही. अखेर ४ जुलै रोजी सकाळी या व्यक्तीचे प्रेत दुर्गंधी येत असल्याने कुजलेल्या अवस्थेत त्या विहिरीतच मिळून आले.

यासंदर्भात सरफराज खान अय्युब खान ( वय ३९ वर्षे राहणार सईद पुरा आठवडे बाजार यावल) यांनी यावल पोलीस स्टेशनला खबर दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी नेताजी पंडित वंजारी हे करीत आहेत.

Exit mobile version