Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आजपासून श्री काळभैरव नाथांचा दोन दिवशीय यात्रोत्सव

अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील गोवर्धन-मारवड -बोरगाव सह परिसराचे आराध्य दैवत व भारतातील तीन स्वयंभू भैरवनाथा पैकी एक असलेल्या श्री कालभैरव नाथांचा दोन दिवसीय यात्रोत्सव दरवर्षी  कृष्ण पक्ष कार्तिकी अष्टमीला मोठ्या उत्साहात साजरा होतो. यावर्षीही आज मंगळवार  दि. १५ नोव्हेबरपासून दोन दिवस यात्रोत्सव साजरा होणार असून माळण नदीकाठी साजरा करण्यात येणार आहे. यासाठी मंदिर संस्थान व पोलीस प्रशासन यात्रोत्सव यशस्वीतेसाठी सज्ज झाले आहे.

 

तालुक्यातीलच नाही तर राज्यातील अनेक ठिकाणचे भाविकांचे श्रद्धास्थान व परिसराचे आराध्य दैवत असलेल्या भारतातील स्वयंभू स्थान असलेले श्री कालभैरवनाथ मंदिराचा महिमा चहोदूर असल्याने सालाबादप्रमाणे कार्तिक अष्टमीला जयंतीच्या रुपात कालभैरव नाथांचा यात्रोत्सव साजरा केला जातो. यावर्षीही धुमधडाक्यात यात्रोत्सवात भाविकांची अलोट गर्दी होऊन दिवसभर महाप्रसाद वाटप करून वरील तिन्ही गावातीलच आबालवृद्ध दिवसरात्र सेवा देऊन कालभैरव नाथांची रक्षा (धुनी ) कपाळी लावून नवसपूर्तीसाठी विशेष गर्दी होते. यासाठी गेल्यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावमुळे यात्रोत्सव साजरा केला नव्हता.  मंगळवार ता.१५  नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता धूप, ध्यान, आरती, ओम महाकाल भैरवनाथ पालखीची मिरवणूक रात्री ९  वाजता एकतारी भजनी मंडळ, मारवड, गोवर्धन, बोरगाव येथील ग्रामस्थ तसेच मुख्य यात्रा बुधवार १६ रोजी सकाळी ७  वाजता  मंगल आरती व ध्वजारोहण, ७.३० वाजता महापुजा तसेच सकाळी नऊ वाजेपासून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.  अष्टमीनिमित्त संपूर्ण खानदेशासह दुरवरील भाविक दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात.  कालपासूनच माळन नदीच्या पात्रात पाळणे, पालखे, विविध विक्रेते, खेळने विक्रेते, खाद्यपदार्थांची दुकानांची रेलचेल सुरू झाली आहे. संपूर्ण देशात असलेल्या तीन मंदिरांपैकी एक असलेल्या या मंदिरातील यात्रोत्सवानिमित्त मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी येणार असून दोन वर्षापासून बंद असलेला यात्रोत्सव यंदा होत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये ही उत्साहाचे वातावरण आहे.

 

Exit mobile version