Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आजचा दिवस भारतासाठी महत्वाचा : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली, वृत्तसेवा । आजचा दिवस भारतासाठी खूप महत्त्वाचा असून, २१ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी भारतीय लष्करानं विजयाचा झेंडा फडकावला होता. कारगिल युद्ध ज्या परिस्थितीमध्ये झालं, ते भारत कधीही विसरू शकत नाही, असं सांगत मोदी यांनी शहिदांच्या शौर्याला अभिवादन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधतांना कारगिल विजय दिनाचं स्मरण केलं.

पंतप्रधान मोदी म्हणाले, २१ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी भारतीय लष्करानं विजयाचा झेंडा फडकावला होता. कारगिल युद्ध ज्या परिस्थितीमध्ये झालं, ते भारत कधीही विसरू शकत नाही. पाकिस्ताननं मोठंमोठं मनसुबे ठेवून भारताच्या भूमीवर कब्जा करण्यासाठी आणि स्वतःच्या देशातील अंतर्गत कलहांवरून लक्ष हटवण्यासाठी हे धाडस केलं होतं. भारत त्यावेळी पाकिस्तानसोबत चांगले संबंध प्रस्थापित व्हावेत म्हणून प्रयत्न करत होता. पण म्हणतात ना दुष्टाचा स्वभावचं असतो की, प्रत्येकाशी कोणतंही कारण नसताना शत्रुत्व करणं. अशा स्वभावाचे लोकं जे चांगलं करतात, त्यांच्याही नुकसानीचा विचार करतात. त्यामुळेच भारताकडून मैत्रीचे प्रयत्न होत असताना पाकिस्तानकडून पाठीत खंजिर खुपसण्याचा प्रयत्न केला होता. पण, त्यानंतर भारताच्या पराक्रमी सैन्यानं आपली ताकद दाखवून दिली. हे सगळं संपूर्ण जगानं बघितलं. तुम्ही कल्पना करू शकता, उंच पहाडांवर असलेला शत्रू आणि खालून लढणारं भारताचं लष्कर. पण विजय पहाडांचा नाही झाला, तर भारताच्या खऱ्या शौर्याची झाला,” असं मोदी म्हणाले.

Exit mobile version