Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आगामी निवडणूकांसाठी शिवसेना सज्ज- गुलाबराव वाघ

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । समाजकारणाचे ध्येय घेऊन शिवसेनेची वाटचाल सुरू असून यात सर्वसामान्य शिवसैनिकांना न्याय मिळाला आहे. आपल्याला पक्षाने खूप दिले असून आता पक्षाला देण्याची गरज आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेचे भगवा फडकावण्यासाठी सज्ज असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी केले.

 

 

धरणगाव येथील शिंपी समाज मंगल कार्यालयात शिवसेनेची बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी त्यांनी पक्षाची ध्येयधोरणे आणि राज्य सरकारने मागील  कालखंडात विविध शेतकऱ्यांचा योजना व  पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र चे संवेदनशील माजी मुख्यमंत्री उध्दव साहेब ठाकरे यांनी केलेली कामे ही जनतेपर्यंत पोहचवण्याचे आवाहन केले. ज्यांच्या विजयासाठी आपण जीवाचे रान केलं ते गुलाबराव पाटील यांच्या विधानसभेचा निवडणूकित विजयासाठी शिवसैनिक यांनी जीवाचे रान केलं त्यानी बंडखोरी केली. हे मानला धक्का देणार आहे. पण शिवसैनिक डगमगू नका, एक गुलाबराव फुटला पण दुसरा गुलाबराव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील.  शिवसेना हे अक्षरच आपले ऊर्जा आहे, त्यातून आपले ऊर्जास्रोत निर्माण होते..

 

आपल्या भाषणात गुलाबराव वाघ यांनी शिवसेनेची जळगाव ग्रामीणसह जिल्ह्यात मजबूत स्थिती असून आगामी कालखंडातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही पक्षाला चांगले यश लाभणार असल्याचा आशावाद व्यक्त केला. व सेना भवनातून आलेल्या प्रतिज्ञापत्र जास्तीत जास्त पदाधिकारी यांनी भरून देण्याचे आव्हान केलं.  तसेच भविष्यात गद्दारांना धडा शिकवण्यात येणार असल्याचा इशारा देखील त्यांनी याप्रसंगी दिला. तसेच शिवसैनिक यांनी बैठीस मोठ्या प्रमाणावर उपस्थित दिली.

 

या बैठकीत शिवसेनेचे सहसपर्क प्रमुख गुलाबराव वाघ,  जिल्हा प्रमुख विष्णू भागळे, माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, माजी प्रभारी नगराध्यक्ष वासुदेव चौधरी, सामाजिक कार्यकर्ते फिरोज पटेल, राजेंद्र ठाकरे, जिल्हा संघटक अॅड. शरद माळी, व्यापारी सेनेचे दिनेश येवले, अल्पसंख्याकचे वसीम पिजारी यांची उपस्थिती होती.

 

 

शिवसेनेचे  नगरसेवक, शहरातील विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन व सदस्य, शिवसेना, युवासेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

यावेळी फिरोज पटेल यांनी आपल्या मनोगतात माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष सलीम पटेल यांच्या कार्याचा लेखा जोखा मांडला आणि आम्ही खरी शिवसेना म्हणजे उध्दव साहेबची शिवसेना सोबत राहू,  शिवसेनाचा पडतीच्या काळात आता साथ देण्याची वेळ आहे. हीच साथ स्व. सलीमला खरी आदरांजली ठरेल. तसेच सर्व मुस्लिम समाज हा शिवसेनेचा पाठीशी राहील, असे मत पटेल यांनी व्यक्त केले.

 

शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष व उद्योगपती सुरेश नाना चौधरी यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी निराधार आरोपांना तात्काळ उत्तर देण्याची तयारी ठेवण्याचे आवाहन केले. तसेच आगामी काळात आम्ही शिवसेना ला तन मन धनाने रणनीती आखू , उद्धव साहेब जो आदेश देतील त्याचे पालन करू मा उद्धव साहेब हे एकमेव असे मुख्यमंत्री होते की त्याच्या पदांचा राजीनामा दिला तेव्हा महाराष्ट्र तील जनतेच्या डोळ्यात अश्रू होते पण बंडखोर ना एवढं दिल असून त्यानी त्याच्या विश्वास घात केला.

 

 

तर अँड शरद माळी यांनी खरच हिंदुत्व साठी बंडखोर केली असेल तर आमदारकीचा राजीनामा द्यावा स्वतःच्या स्वार्थासाठी यांनी बंडखोरी केली. तसेच माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी भावुक असे मनोगत व्यक्त केले. शिवसेनेचे बैठकीचा  माध्यमातून आगामी निवडणुकांची तयारी करून धरणगाव नगरपालिकेवर झेंडा फडकणार असे मत व्यक्त केले.

 

माजी नगरसेवक भागवत चौधरी यांनी शिवसेना ही कोणाला डगमगनारी नाही. शिवसेनेचा शिवसैनिक हा वाघ आहे. नेते फुटतात पण निष्ठवंत शिवसैनिक हा बाळासाहेब चा विचारांवर आजही शिवसेना सोबत आहे. शिवसैनिकला लाभ नसतो लाभ घेणारे फुटल्याची खंत त्यानी व्यक्त केली.

 

तसेच नवनिर्वाचित विकास सोसायटीत घवघवीत यश मिळवले यश चे किंगमेकर सुरेश नाना चौधरी व चेरमन उमेश महाजन , कैलास मराठे याचा सत्कार करण्यात आला.

 

शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू भागळे यांनी सांगितले की, बंडखोर आमदारांनी माझ्या अज्ञानाचा फायदा घेतला. निष्ठवंत शिवसैनिक  हे माझे कवच आहे, ते माझ्या सोबत असल्याचं उध्दव ठाकरेंनी मार्गदर्शन केले होते. शिवसेना पक्षप्रमुख मा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे फक्त शिवसेनाप्रमुख नसून ते एखाद्या कुटुंबप्रमुखासारखे व संवेदनशील मुख्यमंत्री होते असे सांगितले. यावेळी शेकडो शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते नगरसेवक नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सोसायटीच्या चेरमन संचालक मंडळ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशहर प्रमुख किरण अग्निहोत्रीयांनी केले तर आभार कार्यालय प्रमुख विनोद रोकडे  यांनी मानले.

Exit mobile version