Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आगामी निवडणूकांसाठी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे मोर्चे बांधणीला सुरूवात

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आगामी काळात होणाऱ्या निवडणूकीसाठी जनशक्ती पक्षाने मोर्चे बांधणीला तयारी सुरू केली आहे. यासाठी सक्षम उमदेवार देणार असून मोठ्या ताकदीने निवडणूका लढविणार आहे. अशी माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख अनिल चौधरी यांनी शहरातील पद्मालय विश्रामगृह येथे बुधवारी ३१ मे रोजी दुपारी ४ वाजता पत्रकार परिषदेत दिली.

 

जिल्ह्यात आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणूकांसह जिल्हा परिषद, जळगाव महापालिका निवडणूकांमध्ये यशस्वी कामगिरी करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाकडून संघटना बांधणीवर भर दिला जात आहे. यात पहिल्या टप्प्यात पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आले आहे. यात जिल्हा युवक जिल्हाध्यक्षपदी निलेश कोळी, जळगाव लोकसभा क्षेत्र प्रमुखपदी पराग कोचूरे, जळगाव शहराध्यक्षपदी प्रवीण पाटील, शहर युवक अध्यक्षपदी सचिन हटकर यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी अनिल चौधरी यांनी सांगितले की, जळगाव शहरातील अनेक कार्यकर्ते आमच्या संपर्कात असून पक्ष प्रमुख बच्चू कडू यांच्या नेतृत्वात काम करण्यासाठी अनेक तरूण पक्षात येणास इच्छुक आहे. परंतू काम करणाऱ्या कार्यकर्त्याला पक्षात प्रवेश दिला जाणार आहे. दरम्यान जळगाव महापालिकेच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर मोर्चे बांधणी सुरू आहे.”जळगावात कामेच झाली नसून यामुळे लोकांची मोठी ओरड आहे. यामुळे प्रहार जनशक्ती पक्ष जळगाव महापालिका निवडणूक पूर्ण शक्तीनिशी लढणार असून आम्ही नवीन उमेदवार देणार आहोत ! अशी माहिती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख अनिल चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Exit mobile version