Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आखतवाडे येथील तरुणाचा विहीर पडून मृत्यू

पाचोरा–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |तालुक्यातील आखतवाडे येथील एका ३५ वर्षीय तरुणाचा शेतातील विहीरीत पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

 

पाचोरा तालुक्यातील आखतवाडे येथील रविंद्र रामा गढरी‌ (वय – ३५) हे आज दि. २० मे रोजी त्यांचे शेतात जात असतांना अचानक त्यांचा पाय घसरून ते विहिरीत पडले. सदरचा प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात येताच रविंद्र गढरी यांना विहिरीतून बाहेर काढून तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी रविंद्र गढरी यांना मृत घोषित केले. घटने प्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक अमोल पाटील हे करीत आहे. मयत रविंद्र गढरी यांचे पाश्चात्य आई, वडिल, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोन भाऊ असा परिवार आहे.

Exit mobile version