Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आक्षेपार्ह हॅशटॅग हटवा ; केंद्राची ट्विटरला नोटीस

नवी दिल्ली: वृत्तसंस्था । दिल्लीतील ट्रॅक्टर रॅलीनंतर शेतकऱ्यांच्या नरसंहाराचा हॅशटॅग ट्विटरवरून सुरू होता. हा हॅशटॅग आणि ज्या अकाउंटवरून हा हॅशटॅग चालवला गेला त्यावर कारवाई करा, अन्यथा तुमच्यावर कारवाई करू, अशी नोटीसच केंद्र सरकारने ट्विटरला बजावली आहे.

केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालयाने ट्विटरला ही नोटीस बजावली आहे. दिल्लीतील शेतकरी आंदोलनानंतर ट्विटरवरून #ModiPlanningFarmerGenocide हा हॅशटॅग वापरण्यात आला होता. प्रत्यक्षात असं काहीही घडलेलं नसतानाही हा हॅशटॅग वापरण्यात आला होता. ट्विटरनेही केंद्र सरकारच्या तक्रारीनंतर 250 ट्विटर अकाउंट ब्लॉक केले होते. मात्र, पुन्हा हे ट्विटर अकाउंट सुरू करण्यात आले.

ट्विटरच्या या निर्णयामुळे केंद्र सरकार भडकले आहे. ट्विटरवरील कंटेस्ट पोस्ट तथ्यात्मकरित्या चुकीच्या होत्या. केवळ द्वेष पसरविणे हा त्यामागचा हेतू होता. समाजात तणाव निर्माण करण्यासाठी ठरवून उघडण्यात आलेली ती मोहीम होती. या मोहिमेला काहीच आधार नव्हता, असंही नोटिसीत म्हटलं आहे. केंद्राने ट्विटरला सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाची आठवणही करून दिली आहे. त्यात सर्वोच्च न्यायालयाने ट्विटर कोर्टासारखे निर्णय घेऊ शकत नाही, असं म्हटलं होतं.

Exit mobile version