Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत

भुसावळ प्रतिनिधी । ट्विटरवर आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी वरणगाव येथील एकाविरूध्द गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

वरणगाव येथील संजय प्रभाकर परदेशी, रा. मोठी होळी यांनी ९ एप्रिलला पाच वाजे पूर्वी आपल्या स्वतःच्या ट्विटर अकाउंटवरून सामाजिक तेढ निर्माण करणारी पोस्ट व्हायरल केली. ही बाब जळगाव येथील सायबर पोलीस स्टेशनच्या लक्षात आली. या अनुषंगाने पोलीस राहुल येवले यांच्या फिर्यादीवरून संजय प्रभाकर परदेशी यांच्याविरुद्ध भादंवि कलम २९५ अ, ५०५, १८८ सह आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ५२ नुसार फौजदार सुनील वाणी यांनी दाखल करून घेतली. आरोपीस अटक करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Exit mobile version