Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आकाश महालपूरे यांचा पुरस्काराने गौरव

 

 

पाचोरा, प्रतिनिधी ! संजीवनी युवा काव्य पुरस्कार २०२१ ने आकाश दिपक महालपुरे  यांचा नुकताच गौरव करण्यात आला

 

विविक्ष क्षेत्रातील समाजासाठी झटणाऱ्या  समर्पित लोकांचा  सन्मान संजीवनी शेती व शिक्षण  संस्थेकडून  छत्रपती गुणीजन गौरव  पुरस्काराने  संगमनेर येथे  करण्यात आला .

 

या संमेलनाचे अध्यक्ष राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, उदघाटक विधानसभा उपाध्यक्ष प्रमुख नरहरी झिरवाळ, पद्मश्री बीजमाता राहीबाई पोपरे, विधान परिषद सदस्य सुधीर तांबे, महाराष्ट्र युवक कांग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे, संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गा तांबे, स्वागताध्यक्ष व आयोजक ज्ञानेश्वर सानप आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संजीवनी युवा काव्य पुरस्कार २०२१ ने आकाश दिपक महालपूरे, ( लेखक व कवी , गोंदेगाव ) यांना त्यांच्या संजीवनी वर आधारित रचलेल्या काव्याची दखल घेऊन या सोहळ्यात मालपाणी सभागृह संगमनेर येथे  सन्मानित करण्यात आले . आकाश महालपूरे यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Exit mobile version