Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आंध्र प्रदेशातील कोविड सेंटरला भीषण आग ; सात रुग्णांचा गुदमरुन मृत्यू

विजयवाडा (वृत्तसंस्था) आंध्र प्रदेशमधील विजयवाडा येथे कोविड सेंटर असलेल्या एका हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत सात रुग्णांचा गुदमरुन मृत्यू झाला आहे. आज (रविवार) पहाटे ५ वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

 

आज (रविवार) पहाटे ५ वाजेच्या सुमारास स्वर्ण पॅलेस हॉटेल या रुपांतरीत कोविड केअर सेंटरमध्ये शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली. पहाटे आग लागल्यामुळे बहुतांश रुग्ण झोपलेले होते. त्यामुळी यात सात रुग्णांचा गुदमरुन मृत्यू झाला आहे, तर ३० जणांना वाचवण्यात यश आले आहे. आगीची माहिती कळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या असून बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे. एनडीआरएफच्या कर्मचाऱ्यांनी पीपीई किट घालून मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती समोर येत आहे.आज (रविवार) पहाटे ५ वाजेच्या सुमारास कोविड सेंटर असलेल्या हॉटेलला शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली. पहाटे आग लागल्यामुळे बहुतांश रुग्ण झोपलेले होते. त्यामुळी यात सात रुग्णांचा गुदमरुन मृत्यू झाला आहे, तर ३० जणांना वाचवण्यात यश आले आहे. आगीची माहिती कळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या असून बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती समोर येत आहे.

Exit mobile version